साक्षीदार फितूर होणार नाहीत, याची काळजी का घेतली गेली नाही?
नितीन आगे खून खटल्यात साक्षीदार फितूर होणार नाहीत, याची काळजी सरकारी पक्षानं घ्यायला पाहिजे होती. ती घेतली गेली नाही. कदाचित प्रस्थापित, उच्चवर्गीय, सवर्ण घरातील व्यक्ती जर अन्यायग्रस्त असती तर तशी काळजी घेतली गेली असती, असं म्हणण्यास मात्र नक्कीच खूपच जागा आहे. नितीन आगेच्या वडिलांना खटल्याचा निकाल लागल्याचं प्रसिद्धी माध्यमातून कळतं याचा अर्थ तोच होतो.......